जागृत देवस्थान कोळंबा जत्रौत्सवाला भक्तांची अलोट गर्दी

बाबा कोळंबा महाराजा… असे म्हणत मागील नवसाची केली फेड

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) : कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील जागृत आणि नवसाला पावणारा, भक्तांच्या हाकेला धावणारा श्री देव कोळंबा देवाचा जत्रोत्सव आज भक्तांच्या अलोट गर्दीने नांदगाव कोळंबा नगरी परिसर भक्तीमय वातावरणात सजलेला दिसत आहे. आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून कळंबा देवाची धार्मिक पूजा व झाल्यानंतर मागील नवसाची फेड करण्यासाठी सर्व भक्त जणांनी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या त्यात कोळंबा देवाला नवसाची फेड म्हणून त्याच्या पाच चाळ्यांना भक्ष म्हणून कोंबडा व बकरा देण्याची प्रथा आहे.

या जत्रेनिमित्ताने कोळंबा नगरी परिसर विविध दुकांनांनी सजलेला दिसत आहे. मुंबईकर चाकरमानी तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आलेले आहेत.सर्व भाविकांना मटण भाकरी प्रसाद म्हणून दिला जातो.

नांदगाव परीसरातील जवळपास असलेल्या गावातील घरोघरी भाकरीचे पीठ दिले जाते.यासाठी जवळपास 700 किलो भाकरी चे पिठ तयार करून घरोघरी वाटप केले होते. बरेच भक्त गण स्वतः हून मंडळाकडून पिठ घेऊन जात श्रध्देने भाकरी भाजून देतात.

सायंकाळी ठीक 3 वाजल्यापासून भक्त गण दर्शनासाठी व महाप्रसादासाठी रांगा लावल्या होत्या.येणार्या सर्व भक्तांना मटण भाकरी प्रसाद म्हणून दिला जातो.महीला व पुरुष मंडळी साठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. दर्शनासाठी मुंबई गोवा महामार्गावरील दुतर्फा लांबलचक रांगा लागल्या होत्या.

कुठल्याही प्रकारे भाविकांना त्रास होऊ नये व रांगेत सर्वांना दर्शन व प्रसाद मिळण्यासाठी कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळाचे अध्यक्ष नागेश मोरये यांनी व मंडळाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!