आचरा येथील संतोष उर्फ “ब्रुसली” घाडी यांचे निधन….!

आचरा (प्रतिनिधी) : आचरा देऊळवाडी येथील रहिवासी, सर्वांच्या परिचयातील संतोष उर्फ “ब्रुसली” घाडी (वय ५०) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. संतोष घाडी हे हसतमुख, मनमिळाऊ आणि दिलखुलास स्वभावामुळे गावात लोकप्रिय होते. आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणारे ते एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांसह मित्रपरिवार, क्रिकेटप्रेमी आणि संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, बहीण, भाऊजी, भाची असा परिवार आहे. आचरा – देऊळवाडी येथील अंगणवाडी सेविका सायली घाडी यांचे ते पती होत.

error: Content is protected !!