जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत आवाहन
कासार्डे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व शिवछत्रपती क्रीडापीठ पुणे अंतर्गत क्रीडा प्रबोधिनी प्रवेश सन २०२६-२७ करीता निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. राज्यात ८ क्रीडा प्रबोधिनी कार्यरत असून यामध्ये प्रवेशाकरीता पुनःश्च एकदा निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये जिम्नॅस्टिक्स, अॅथलेटिक्स, सायकलिंग (खेलो इंडिया राज्य निपुनता केंद्र), शुटींग, बॉक्सिंग, आर्चरी या खेळांच्या सरळ प्रवेश व कौशल्य चाचण्या घेण्यात येणार आहेत.
क्रीडा प्रबोधिनीसाठी राज्यस्तरावर सरळ प्रवेश चाचण्या दि. २९ जून २०२६ रोजी जिम्नॅस्टिक, अॅथलेटिक्स, सायकलिंग शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे, शुटींग छ. संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर, बॉक्सिंग, क्रीडा प्रबोधिनी अकोला, आर्चरी क्रीडा प्रबोधिनी अमरावती येथे होणार आहेत तसेच सदर खेळांच्या राज्यस्तर खेळनिहाय कौशल्य चाचण्या दि. ३० जून २०२६ रोजी वर नमुद केलेल्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत.
क्रीडा प्रबोधिनी प्रवेशाकरीता सरळ प्रवेश चाचणीसाठी राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व केलेले तसेच कौशल्य चाचणीसाठी राज्यस्तर सहभागी खेळाडू पात्र राहतील. १९ वर्ष आतील खेळाडूंना या चाचण्यांमध्ये सहभाग घेता येईल.
क्रीडा प्रबोधिनी अंतर्गत निवड होणा-या खेळाडूंना निवास, भोजन, गणवेश व प्रशिक्षण, तज्ञ मार्गदर्शक इ. सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यावरील खर्च शासनाव्दारे करण्यात येणार आहे.तरी वर नमुद केलेल्या अर्हता धारक खेळाडूंनी चाचण्यांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. विजय शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
खेळनिहाय निवड चाचण्यांचे आयोजन पुढीलप्रमाणे-
राज्यस्तर सरळ प्रवेश प्रक्रीया राबविण्याचा कार्यक्रम-
१ जिम्नॅस्टिक्स, मैदानी, सायकलिंग ( खेलो इंडीया राज्य निपुणता केंद्र) – 29 जून 2026 – 29 जून 2026 रोजी सकाळी 9.00 वा. पर्यंत चाचणी स्थळी – शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे 45
२ शुटिंग – 29 जून 2026 – 29 जून 2026 रोजी सकाळी 9.00 वा. पर्यंत चाचणी स्थळी – विभागीय क्रीडा संकुल, कोल्हापूर
३ बॉक्सिंग – 29 जून 2026 – 29 जून 2026 रोजी सकाळी 9.00 वा. पर्यंत चाचणी स्थळी – क्रीडा प्रबोधिनी, अकोला
४ आर्चरी – 29 जून 2026 – 29 जून 2026 रोजी सकाळी 9.00 वा. पर्यंत चाचणी स्थळी – क्रीडा प्रबोधिनी, अमरावती
राज्यस्तर खेळनिहाय कौशल्य चाचण्या कार्यक्रम
१ जिम्नॅस्टिक्स, मैदानी, सायकलिंग ( खेलो इंडीया राज्य निपुणता केंद्र) – 30 जून 2026 30 जून 2026 रोजी सकाळी 9.00 वा. पर्यंत चाचणी स्थळी – शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे 45
२ शुटिंग – 30 जून 2026 – 30 जून 2026 रोजी सकाळी 9.00 वा. पर्यंत चाचणी स्थळी – विभागीय क्रीडा संकुल, कोल्हापूर
३ बॉक्सिंग – 30 जून 2026 – 30 जून 2026 रोजी सकाळी 9.00 वा. पर्यंत चाचणी स्थळी – क्रीडा प्रबोधिनी, अकोला
४ आर्चरी – 30 जून 2026 – 30 जून 2026 रोजी सकाळी 9.00 वा. पर्यंत चाचणी स्थळी – क्रीडा प्रबोधिनी, अमरावती












