सम्यक संबोधी साहित्य संस्थेतर्फे उत्कृष्ट पुस्तक लेख स्पर्धा

पारितोषिकांबरोबरच निवडक लेखांचे पुस्तक प्रसिद्ध करणार

31 ऑगस्ट पर्यंत लेखन पाठविण्याचे आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्ग तर्फे उत्कृष्ट पुस्तक लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाना तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट दहा लेखांचे संपादित पुस्तक प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम, सचिव सूर्यकांत साळुंके यांनी दिली.

या स्पर्धेतील उत्कृष्ट प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे एक हजार, सातशे आणि पाचशे रुपये तसेच स्मृतीचिन्ह, ग्रंथ असे पारितोषिक देण्यात येणार आहे.त्याच बरोबर दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे- आपल्याला आवडत्या कोणत्याही पुस्तकावर त्या पुस्तकाचे मर्म उलगडून दाखविणारा किमान 1000 शब्दाचा आस्वादात्मक लेख लिहिणे आवश्यक आहे. कथा, कादंबरी, कविता, नाटक, व्यक्ती चरित्र, आत्मचरित्र किंवा या साहित्य प्रकारातील कोणताही भाषांतरीत ग्रंथ या विषयावरील ग्रंथावर लिहिलेल्या लेखनाला पारितोषिकासाठी विचार करण्यात येणार आहे. लेखन पाठविण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 असून प्रत्येक लेखा स्वतंत्र पानावर टाईप करून खालील दिलेल्या पत्त्यावर किंवा पोस्टाने पाठविणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर पाठविलेल्या लेखाची संपादित ग्रंथासाठी निवड झाली असल्यास तो लेख युनिकोड मध्ये टाईप केलेला असावा.याची स्पर्धकाने नोंद घ्यावी.

लेख पाठविण्यासाठी पत्ता- किशोर देऊ कदम
फ्लोरेट कॉलेज कणकवली, कणकवली कॉलेज रोड
नवीन पोस्ट ऑफिसच्या वरती,
कणकवली-सिंधुदुर्ग
पिन.नंबर 416602
मोबाईल नंबर 9422963655

error: Content is protected !!