असलदे सोसायटी संस्था पातळीवर कर्ज वसुलीत ठरली अव्वल – चेअरमन भगवान लोके

कणकवली तालुक्यात 37 संस्थांमध्ये सलग 5 वर्षे सातत्यपूर्वक उत्कृष्ट कामगिरी ; संस्थेची 1 कोटींच्या उलाढालीकडे वाटचाल

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात 37 विविध कार्यकारी विकास संस्थांमध्ये संस्था पातळीवर 100 टक्के वसुलीत पात्र संस्थांमध्ये एकमेव असलदे अव्वल ठरली आहे.तर जिल्ह्यातील 227 विकास संस्थांमध्ये पहिल्या 5 संस्थांमध्ये असलदे विकास संस्थेने 100 टक्के कर्ज वसुलीत यश मिळवले आहे. कणकवली तालुक्यात 37 संस्थांमध्ये सलग 5 वर्षे सातत्यपूर्वक संस्थेतील सर्व प्रकारचे असलेले सभासद कर्जदारांनी आपली नियमित कर्जे भरुन सहकार्य केलं आहे. नेहमीच असलदे सोसायटीने उत्कृष्ट कामगिरी करत गेल्या 5 वर्गात उलाढाल 85 लाखांवर पोहचली आहे. आता संस्थेची उलाढाल 1 कोटींपर्यंत नेण्याकडे आमची वाटचाल आहे. अवघ्या बाराशे लोकसंख्या असलेल्या गावात सहकार चळवळ रुजत आहे. आमची विकास सोसायटी शेतकरी व सभासदांचे हित केंद्रस्थानी ठेवून काम करत असल्याची माहिती सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी दिली आहे.

असलदे विकास सोसायटी संस्था व बॅंक पातळीवर 100 टक्के वसुल ठरल्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची संचालक मंडळाने सदिच्छा भेट घेतली. यावेळी बॅंक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वात बॅंकेच्या यशस्वी वाटचालीबद्दल पुष्पगुच्छ देवून असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी असलदे संचालक मंडळाचे बॅंक अध्यक्ष मनीष दळवी यांनी संस्था 100 टक्के वसुल पात्र ठरल्याबद्दल विशेष कौतुक केले. यावेळी जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत , बॅंक संचालक विठ्ठल देसाई , संचालिका प्रज्ञा ढवण, गजानन गावडे , मीता राणे आदींसह संस्थेचे व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , संस्थेचे संचालक शत्रुघ्न डामरे , विठ्ठल खरात, विजय डामरे , मनोज लोके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

कणकवली तालुक्यातील श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. असलदे या संस्थेचा गेल्या 5 मोठ्या प्रमाणात कर्ज वितरण करण्यात आले. त्यामुळे 100 टक्के कर्ज वसुली संस्था पातळीवर ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. नव्या संचालक मंडळाने ज्यावेळी कामकाज सुरु केले. त्यापूर्वी ना नफा ना तोटा तत्वावर चालणारी संस्था होती. पहिल्याच वर्षापासून संस्था नफ्यात आणत सभासदांना लाभांश वाटपाचे काम करण्यात आले. या संस्थेच्या माध्यमातून गावातील शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने शेती कर्ज, पिक कर्ज, गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, शेती अवजारे कर्ज या कर्ज योजना जिल्हा बॅंकेच्या सहकार्यांने राबवण्यात येत असल्याचे भगवान लोके यांनी सांगितले.

गेल्या आर्थिक वर्षात असलदे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये 71 सभासदांना भात शेती कर्ज 19 लाख 88 हजार 600 रुपयांचे करण्यात आले होते. बागायती पिक कर्जामध्ये 27 सभासदांना 23 लाख 92 हजार 500 रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होते. तसेच अल्प मुदत बिगरशेती 15 सभासदांना 3 लाख 21 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून एकूण 66 लाख 90 हजार रुपयांचे कर्ज वितरण आहे. मध्यम मुदत बिगरशेती कर्ज 9 सभासदांना 19 लाख 53 हजार 897 रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. असलदे सारख्या छोट्या गावात सुमारे 125 ते 130 सभासदांना विविध प्रकारचे कर्ज वाटप करण्यात आले. मात्र, सभासदांच्या सहकार्यांमुळे कर्ज माफीची घोषणा सरकारने केली असताना देखील सर्व कर्जदारांनी संस्थेला सहकार्य करत संपुर्ण कर्ज पूर्ण फेड केल्याने संस्था व बॅंक पातळीवर 100 टक्के यश संस्थेला मिळाले आहे. त्यामुळे संस्थेच्या सभासदांचे विशेष कौतुक असून संचालक मंडळाने घेतलेली मेहनत यशस्वी ठरल्याचे भगवान लोके यांनी सांगितले.

या संस्थेचे कामकाम यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी व्हाईस चेअरमन दयानंद हडकर संचालक शत्रुघ्न डामरे, परशुराम परब, उदय परब, शामु परब, विठ्ठल खरात, प्रकाश खरात, कांचन लोके, अनंत तांबे, संतोष परब, सुनिता नरे, सचिव अजय गोसावी आदींनी मेहनत घेतली आहे. आगामी काळात संस्थेची उलाढाल 1 कोटी पर्यंत नेण्याचा संकल्प केला असल्याचे प्रसिध्दी पत्रकात चेअरमन भगवान लोके यांनी म्हटले आहे.
फोटो-

error: Content is protected !!