४ लाखाच्या अवैध गोवा बनावट दारूची वाहतूक करताना पालकमंत्री नितेश राणेंचा कार्यकर्ता अमोल चिंदरकर सापडला रंगेहात

कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांनी केला पोलखोल

कणकवली (प्रतिनिधी) : एकीकडे पालकमंत्री नितेश राणे अवैध धंद्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात थारा देणार नाही असे सांगत आहेत. दुसरीकडे मात्र त्यांचेच भाजप कार्यकर्ते राजरोसपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीची अवैध दारू आणत आहेत हे कालच्या पोलिसांच्या कारवाई वरून उघड झाले आहे. काल गुरुवार दि. २ जुलै रोजी दुपारी २ वाजता पोलिसांनी बांदा चेकपोस्ट येथे पिकअप जीप (MH 07 AJ 5209) अडवून त्यामधून तब्बल ४,४७,२४० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली. हि दारू अमोल लक्ष्मण चिंदरकर (वय ३५. रा. कलमठ ता. कणकवली) हा सिंधुदुर्गात आणत असताना रंगेहात सापडला आहे. अमोल लक्ष्मण चिंदरकर हा पालकमंत्री नितेश राणेंच्या जवळचा आणि भाजप पक्षाचा कार्यकर्ता आहे. नितेश राणेंसोबत तो अनेक वेळा दिसून येतो. नितेश राणेंच्या बॅनर मध्ये देखील त्यांचा फोटो आहे. सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त असल्याशिवाय राजरोसपणे एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही. त्यामुळे अवैध धंदे बंद करण्यावरून पालकमंत्री नितेश राणे करीत असलेल्या घोषणा या केवळ जनतेची दिशाभूल असल्याचे यावरून दिसून येते असा पोलखोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांनी केला आहे.

error: Content is protected !!