आचरा (प्रतिनिधी) : चिंदर भटवाडी येथील युवक रविकांत गावडे यांना आचरा भगवंत गड फाटा येथे मोबाईल पडलेला मिळाला. त्यांनी कोणतीही मोहमाया न ठेवता गावाच्या व्हॉट्सॲप गृप वर मोबाईलचा फोटो काढून टाकला व मोबाईल ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन केले. काही तासांतच चिंदर बाजार येथील चंद्रकांत घाडी यांचा मोबाईल असल्याचे समजले. चंद्रकांत घाडी यांना त्यांनी मोबाईल सुपूर्द केला. सध्याच्या युगात असे प्रसंग कमी पाहावयास मिळतात. रविकांत गावडे यांच्या प्रामाणिक पणा बद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
चिंदर येथील रविकांत गावडे यांचा प्रामाणिकपणा….!












