खारेपाटण महाविद्यालयात वनमहोस्तव सप्ताह निमित्त वृक्षारोप कार्यक्रम संपन्न

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खारेपाटणच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे वनमहोत्सव सप्ताहाचे औचित्य साधून खारेपाटण येथील रामेश्वर नगर परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या दोन्ही बाजूंना वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला.यावेळी जनजागृती रॅलीचे आयोजन देखील महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन केंद्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक वसीम सय्यद उपस्थित होते. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन विषयक जनजागृती रॅली काढली. तर या उपक्रमांतर्गत आंबा, चिंच,कांचन आदी प्रजातींची एकूण ८२ रोपे राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला. पर्यावरण संरक्षण, हरित परिसर निर्मितीडी आणि शाश्वत विकासाचा संदेश देणारा हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

खारेपाटण महाविद्यालयात वनमहोस्तव सप्ताह निमित्त वृक्षारोप करताना प्राचार्य डॉ. ए डी कांबळे व विद्यार्थी.

error: Content is protected !!