वैभववाडी कोकिसरे रेल्वे फाटक ते घंगाळेवाडी परिसरात रस्त्याची वाताहत

अपघात झाल्यावर प्रशासनाला जाग येणार का ? प्रवाशांचा संतप्त सवाल

रस्त्याच्या कडेला वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात रस्ता गेला वाहून

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकिसरे रेल्वे फाटक ते घंगाळेवाडी परिसरातील रस्त्यावर अनेक छोटे मोठे खड्डे पडले असून वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या कडेला व रस्त्यालगत असलेल्या मातीच्या भरावात मोठे ट्रक फसण्याच्या घटना घडत आहेत. घंगाळेवाडी येथील रस्त्याच्या कडेला वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात रस्ता वाहुन जात असुन रस्त्यावर मोठा चर पडला आहे तसेच विविध ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. सदर परिसरात प्रवास करताना वाहन चालकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. अपघाताची प्रशासन वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!