गुरुकुल टॅलेंट सर्च परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी
कणकवली (प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कु. अन्वय देसाई यांने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती मध्ये कणकवली तालुका ग्रामीण विभागात पहिला येण्याचा मान पटकावला. तसेच त्याचा जिल्ह्यात सोळावा क्रमांक आला व. तत्पूर्वी झालेल्या एन एम एस एस परीक्षेत तो जिल्ह्यात दुसरा आला.
त्याच प्रमाणे गुरुकुल टॅलेंट सर्च या परीक्षेच्या आजच जाहीर झालेल्या निकालात सुध्दा तो जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला
शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक संस्थाचालक व सर्व विद्यार्थी व पालक यांनी त्याच्या या यशाबद्दल विशेष कौतुक केले.











