कासार्डे उत्तर गावठण येथील सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर रामचंद्र सावंत यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : श्यामसुंदर सावंत तथा सर्वांचे( अण्णा) हे धार्मिक कार्यक्रमाबरोबरच समाजातील कोणत्याही कार्यात पूर्णता झोकून देऊन काम करणारे भजनामध्ये शेकडो अभंग, गौळणी तोंडपाठ असलेले श्यामसुंदर सावंत यांचे आज वयाच्या ७८ वर्षी निधन झाले. या वयात ही भजन कुठेही असले तरीही घरातील माणसांचा रोष पत्करून कार्यक्रम स्थळी रात्री अपरात्री उपस्थित राहायचे. कोणत्याही प्रसंगी चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान त्यांनी कधी कमी होऊ दिलेच नाही. समाजाप्रती त्यांना उत्तम जाण होती. स्वयंभू प्रसादिक भजन मंडळ कासार्डे उत्तर गावठाण, जय हनुमान क्रीडा मंडळ, गवळदेव मित्र मंडळ मुंबई, महालक्ष्मी महिला मंडळ कासार्डे उत्तर गावठण या सर्व मंडळाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजया, दोन मुलगे, सुना एक मुलगी, जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.

error: Content is protected !!