इन्सुली परबवाडी येथे वादळी वाऱ्यात माडाचे झाड घरावर; घराचे मोसुमारे दिड लाखांचे नुकसान, 1 जण जखमी

बांदा (प्रतिनिधी) : इन्सुली परबवाडी येथे रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे एका घरावर माडाचे झाड कोसळून दीड लाखाचे नुकसान झाले आहे. या घटनेत घरातील व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. काल रात्री ठीक 10.30 वाजताच्या सुमारास इन्सुली परबवाडी येथील हरी गजानन धरी उर्फ दशरथ धुरी यांच्या घरावर जोरदार वादळी वाऱ्यामुळे माडाचे झाड पडले. झाड घराच्या पत्र्यावर पडल्याने छत पूर्णपणे कोसळले. घरातील साहित्याचेही मोठे नुकसान झाले असून घरातील लोकांना किरकोळ दुखापत झाली आहे.

झाडा पडलयामुळे घराचे कौल तुटले असून आतील खोलीचे छत उडाले आहे. पावसाचे पाणी घरात शिरल्याने घरातील संसार उघड्यावर पडला आहे. घटनेनंतर कुटुंबीयांनी शासनाने तातडीने पाहणी करून योग्य ती मदत द्यावी, अशी विनंती केली आहे. वादळामुळे परिसरात इतरही ठिकाणी झाडे पडल्याच्या तक्रारी आहेत. तालुका प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला सुमारे दिड लाखांचे नुकसान झाले आहे.

error: Content is protected !!