बांदा श्री विठ्ठल मंदिरात १७ जुलै पासून वीणा सप्ताह

बांदा (प्रतिनिधी) : बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही हरिनाम वीणा सप्ताहाला शुक्रवार दि. १७जुलै पासुन प्रारंभ होत आहे.या सप्ताहानिमित्त मंदिरात सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 2४ जुलै रोजी सप्ताहाची सांगता होणार असून शनिवार दि. 2५ जुलै रोजी आषाढी एकादशीचा भव्य सोहळा होणार आहे.बुधवार दि. २९जुलै रोजी गोपाळकाला होणार आहे. या वीणा सप्ताहाच्या नियोजनासाठी ज्येष्ठ भजनकर्मी तथा वीणा सप्ताह नियोजनप्रमुख प्रकाश उर्फ भाऊ मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली पारप्रमुख व सेवेकरी मंडळींची रविवारी श्री विठ्ठल मंदिरात बैठक झाली.

यावेळी सुदन केसरकर, विनीत पडते , साईराज पावसकर, श्रीप्रसाद वाळके , संजय नाईक, मंगलदास साळगांवकर, संतोष नाटेकर, निलेश नाटेकर,प्रितेश केसरकर, आशुतोष भांगले,मंथन विरनोडकर, आदी सेवेकरी उपस्थित होते. यावेळी निश्चित केलेले सप्ताहाचे पार ,विभाग व पारप्रमुख पुढील प्रमाणे आहेत.
१) शुक्रवार दि. १७ जुलै आळवाडा – विनीत पडते, २) शनिवार दि. १८ जुलै रोजी देऊळवाडी – श्रीप्रसाद वाळके , ३) रविवार दि. १९ जुलै रोजी गांधी चौक – सुदन केसरकर ४) सोमवार दि.२० जुलै रोजी निमजगा -गवळीटेंब – संदेश पावसकर,

५) मंगळवार दि. २१ जुलै हॉस्पिटल कट्टा – उमेश काणेकर, भाई शिरसाट
६) बुधवार दि. २२ जुलै रोजी रोजी मारुती गल्ली दत्तप्रसाद पावसकर
७) गुरुवार दि.२३ जुलै रोजी उभाबाजार – निलेश महाजन
शुकवार दि. १७ जुलै रोजी सकाळी १२ वाजता श्री विठ्ठल नामाच्या गजरात भाविकांच्या उपस्थितीत वीणा घेऊन सप्ताहास सुरुवात होईल. शनिवार दि. २४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता सप्ताहाची सांगता होईल.
सप्ताहानिमित्त दररोज नामस्मरण, भजन, गजर, सायंआरती तसेच सायंकाळी ५ ते ६.३० स्थानिक महिलांची भजनसेवा व रात्री १० ते १२ या वेळेत स्थानिक नित्य भजनकर्मींची भजनसेवा होईल. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे
आवाहन श्री विठ्ठल मंदिर ,बांदा च्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!