नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त फ्लोरेट कॉलेजमध्ये ‘फॅब्रिक पेंटिंग स्पर्धेचे’ आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : समाजाशी नाळ जपणाऱ्या लोकप्रतिनिधींचा वाढदिवस सामाजिक व सर्जनशील उपक्रमांनी साजरा करण्याच्या उद्देशाने फ्लोरेट कॉलेज, कणकवली यांच्या वतीने कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेशजी पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘फॅब्रिक पेंटिंग स्पर्धेचे’ आयोजन दि. १४ जुलै रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेची ‘कोकण’ ही आकर्षक थीम असून स्पर्धकांनी कोकणातील निसर्गसौंदर्य, संस्कृती, समुद्रकिनारे, किल्ले, लोकजीवन, परंपरा आणि वैशिष्ट्ये फॅब्रिकवर रंगवून आपल्या कलागुणांचे दर्शन घडवायचे आहे. स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. या अनोख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळण्याबरोबरच आपल्या प्रिय नगराध्यक्षांना कलात्मक पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा अर्पण करण्यात येणार आहेत. यावेळी फ्लोरेट कॉलेजच्या संचालिका सार्था किशोर कदम यांनी सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या रंगकलेतून कोकणाचे सौंदर्य साकारावे आणि नगराध्यक्ष संदेशजी पारकर यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन केले आहे.
“रंगांतून कोकण फुलवूया… आणि आपल्या कलेतून नगराध्यक्षांना मनःपूर्वक शुभेच्छा अर्पण करूया!” 🎨🌴

error: Content is protected !!