सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेचा चढता आलेख

पतसंस्थेच्या बांदा शाखेचे शानदार उदघाटन संपन्न

बांदा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेच्या बांदा शाखेचे उदघाटन सहकारी संस्था सहाय्यक निबंधक अनिल क्षीरसागर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. वैश्य समाज सहकारी पतसंस्थेची ही 11 वी शाखा आहे. बांदा येथील जेष्ठ व्यापारी तथा पतसंस्थेचे संस्थापक सदस्य श्रीकृष्ण उर्फ भाई शिरसाट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी पतसंस्था चेअरमन दिलीप पारकर ,व्हाईस चेअरमन सुभाष भिसे व कार्यकारी मंडळ त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पावसकर,बांदा सरपंच प्रियांका नाईक, बांदा वैश्य समाज अध्यक्ष सुदन केसरकर, माजी जि प सदस्य श्वेता कोरगावकर व अन्य उपस्थित होते.

error: Content is protected !!