श्री अशफाक हाजु यांची रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल खारेपाटण येथे सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत आणि सिंधू – रत्न योजनेचे संचालक श्री किरण उर्फ भैया सामंत यांच्या शिफारशीने शिवसेना पक्षाचे राजापूर तालुका प्रमुख श्री अशफाक इस्माईल हाजू यांची नुकतीच रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली असून त्यांच्या या निवडी बद्दल खारेपाटण विभाग शिवसेना पक्षाच्या वतीने नुकताच त्यांचा पक्ष कार्यालयात सत्कार करण्यात आला.
खारेपाटण शिवसेना संपर्क कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख श्री मंगेश गुरव व खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते श्री अशफाक भाई हाजू यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य श्री गुरूप्रसाद शिंदे,सुधाकर ढेकणे,सौ अस्ताली पवार,युवा कार्यकर्ते संकेत लोकरे,श्री देवानंद ईसवलकर,प्रणय गुरसाळे,आदिनाथ शेट्ये आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना पक्षाचे राजापूर तालुका प्रमुख अशफाक भाई हाजू यांची रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.” पक्षाने जी माझ्यावर जबाबदारी दिली आहे.ती प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष संघटनेच्या वाढीसाठी आपण प्रयत्न करणार असून खारेपाटण गावच्या विकसासाठी आपण नेहमीच तत्पर असणार असल्याचे भावपूर्ण उदगार सत्काराला उत्तर देताना यावेळी श्री अशफाक हाजू यांनी काढले.”

error: Content is protected !!