फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्याबाबत स्वतः कार्यकारी मंडळाच्या सभेत विरोध दर्शवला असताना, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या फी ची रक्कम कोणत्याही परिस्थितीत बांधकामासाठी बेकायदेशीर रित्या वापरू नये. अशा सक्त सूचना प्राचार्य सह पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र सदर इमारतीचे बांधकाम करण्यासाठी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यकारी मंडळाची सभा तसेच महाविद्यालयाच्या विकास समितीमध्ये आवश्यक ती परवानगी घ्यावी असे सांगितले होते. मात्र कुठलीही परवानगी न घेता खोटी माहिती देऊन सदरचे बांधकाम करण्याचा मनमानी घाट घातला आहे. त्याचे भूमिपूजन 15 जुलै रोजी करण्याचे घाईघाईत ठरविले आहे. त्या विरोधात मी 15 जुलै रोजी महाविद्यालयात लाक्षणिक उपोषणासाठी सहकाऱ्यांसह बसणार आहे. याची माहिती तहसीलदार व पोलीस स्टेशन यांना दिली आहे.
नेक ने इन्फ्रास्ट्रक्चर बाबी पूर्ण करावेत असा शेरा दिला आहे. त्यात वर्ग खोल्यांची बाब नाही.त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी सुविधा मुलींसाठी स्वच्छतागृह आयटी लॅब इत्यादी सारख्या बाबी नोंदल्या आहेत. मात्र पुरेशा खोल्या असताना सुद्धा, आणि केवळ 500 विद्यार्थी संख्या असताना नव्या खोल्या बांधून जमा झालेल्या विद्यार्थ्यांच्या लाखो रुपयांच्या फी वर डल्ला का ? विद्यार्थ्यांची जमा रक्कम विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठीच खर्च झाली पाहिजे.खोल्या बांधण्यासाठी कार्यकारिणीने स्वतः निधी उभा केला पाहिजे लाखो रुपये खर्च करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळाला विश्वस्त मंडळाला नाही. त्याला सर्वसाधारण समितीची मंजुरी घेणे आवश्यकच आहे.पत्रातील तारीख 25- 3- 26 च्या कार्यकारी मंडळाच्या सभेत विना एस्टिमेट व विरोधाची चर्चा झाली. मग घाईघाईत भूमिपूजन कशासाठी? याचा पालक, संस्था सदस्य यांनी विचार करावा .ही काळाची गरज आहे.











