आचरा (प्रतिनिधी) : आचरा मार्गे अक्कलकोट एस.टी बस बंद होणार असल्याची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य तथा भाजप गटनेते दिपक सुर्वे यांनी मालवण एस्.टी आगार येथे धाव घेत मालवण आगार प्रमुखांशी चर्चा केली व लेखी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, आचरा मार्गे अक्कलकोट ही एस. टी बस गेल्या दोन महिन्यांपासून नियमित सुरू आहे. सदरची बस ही मालवण आगारामधून दररोज सायंकाळी 4 वाजता सुटते. या बसचा श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा लाभ होत आहे. परंतु सदरची एस.टी बस दि. 15/07/2026 पासून ही बस बंद करण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे सदरची बाब ही अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे सदरची बस बंद केल्यास अक्कलकोटला जाणाऱ्या प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. तरी आपण कृपया याकडे विशेष लक्ष घालून ही बसफेरी बंद करू नये.
आचरा मार्गे अक्कलकोट एस.टी बस कायम स्वरुपी सुरू ठेवा – पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे यांचे मालवण आगार प्रमुखांना निवेदन…!











