क्रीडा शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुकास्तरीय शालेय क्रीडा नियोजन सभा गुरुवार १६ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता तहसीलदार कार्यालय, कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे.सभेचे अध्यक्षस्थान कणकवलीचे तहसीलदार तथा तालुका क्रीडा परिषद, कणकवलीचे अध्यक्ष दिक्षांत देशपांडे भूषविणार असून, गटशिक्षणाधिकारी, कणकवली तथा तालुका क्रीडा परिषदेचे सचिव श्री.गवस यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
तरी कणकवली तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतील, मुख्याध्यापक,केंद्र प्रमुख,क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक, प्रशिक्षक (कोच) तसेच विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे कणकवली तालुका क्रीडा समन्वयक दत्तात्रय मारकड यांनी केले आहे.












