डायमंड टॅलेंट सर्च परीक्षा – २०२६ मध्येजि.प.केंद्रशाळा खारेपाटण नं.१ च्या विद्यार्थ्यांचे सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी) :- DTSE अर्थात डायमंड टॅलेंट सर्च परीक्षा – २०२६ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यामध्ये खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या एकूण सहा विद्यार्थ्यांनी विशेष नैपुण्य पूर्व सुयश प्राप्त केले आहे.यश प्राप्त केलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
डायमंड टॅलेंट सर्च परीक्षेत यश प्राप्त केलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे – अन्वी गिरीश मोरे (इयत्ता २ री ),चिरायू मिथुन शेंगाळे (इयत्ता ३ री ),स्वयंम हर्षल पोरे ( इयत्ता ३ री),राहत कादिर काझी (इयत्ता ४ थी), सांची संतोष पाटणकर (इयत्ता ७ वी ), अन्वी निशिकांत शिंदे (इयत्ता ७ वी ) या शालेय सहा विद्यार्थ्यांनी सदर परीक्षेत यश संपादन केले असून या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्यध्यापिका आरती जोजन यांनी विशेष अभिनंदन केले आहे तर जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष प्राप्ती कट्टी,माजी अध्यक्ष संतोष पाटणकर सदस्य मंगेश ब्रम्हदंडे यांनी गुणवंत विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!