फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या नूतन इमारत वास्तूचा भूमिपूजन सोहळा संपन्न

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी च्या महाविद्यालय नूतन इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम संस्था चेअरमन राजू पटेल तसेच सर्व संस्थां संचालक, सदस्य, सभासद, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

दरम्यान यावेळी माहिती देत असताना संस्था चेअरमन राजू पटेल यांनी, या संस्थेची महाविद्यालयीन कॉमर्स शाखा विनाअनुदानित स्वरूपात सन २०१३ पासून सुरु असून ही शाखा सुरु राहण्यासाठी संस्थेने वेळोवेळी भरपूर निधी खर्च केला असून आता जागतिक स्तरावरून महाविद्यालयांचा दर्जा ठराविणारी येणारी नॅक कमिटीने मागील वेळी संस्थेला “बी” ग्रेड चा दर्जा दिला असून हा दर्जा पुढील वेळी अपग्रेड होण्याच्या दृष्टीने आता संस्था चालकांचा प्रयत्न सुरु असून त्यातील एक पाऊल म्हणजे ही चार खोल्याची इमारत याठिकाणी बांधण्यात येणार असून जवळपास ४८ लाख खर्च याकरिता अपेक्षित असल्याचे सांगितले.

दरम्यान आज झालेल्या नूतन इमारत वास्तूच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी संस्था चेअरमन राजू पटेल यांच्या Ekhon सेक्रेटरी शेखर लिंग्रस, खजिनदार आनंद मर्ये, संस्था संचालक संजय आंग्रे, संदेश पटेल,विठोबा तायशेटे, रंजन नेरुरकर, बबन हळदिवे, सुहास मोदी, महाविद्यालय प्राचार्य नरे, विकास सेवा सोसायटी चेअरमन राजन नानचे,सुंदर पारकर गुरुजी, माजी संस्था संचालक बाळू डोर्ले,श्री पवार, अण्णा तेंडुलकर, मुख्याध्यापक प्रसाद पारकर,श्री सापळे, ग्रा.प. सदस्य पिंटू पटेल विश्वनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते

error: Content is protected !!