कॉपी प्रमोटर मुख्याध्यापक संजय राठोड चा अटकपूर्व जामीन फेटाळला

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद

संजय राठोड चे अटक टाळण्याचे स्वप्न भंगले, अटकेची टांगती तलवार

ओरोस (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा हायस्कुल मधील एसएससी परीक्षेतील कॉपी प्रकरणातील महत्वाचा आरोपी असलेला भुईबावडा हायस्कुल चा मुख्याध्यापक संजय राठोड याचा अटकपूर्व जामीन प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ सुधीर देशपांडे यांनी नामंजूर केला. विशेष म्हणजे या गुन्ह्यातील तपासी अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय तृटीनंतरही कायद्याचा किस पाडत यशस्वी युक्तिवाद करत अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. त्यामुळे एसएससी परीक्षेत कॉपीसारख्या गंभीर गुन्ह्यात प्रथम आरोपी असलेला मुख्याध्यापक संजय राठोड याचे अटक टाळण्याचे स्वप्न भंगले असून आता हायकोर्टात दाद मागणे हा पर्याय आहे अन्यथा आरोपी संजय राठोड वर आता अटकेची टांगती तलवार असणार आहे. आरोपी संजय राठोड हा भुईबावडा आदर्श विद्यामंदिर येथे मुख्याध्यापक असून दहावी ची परीक्षा देणाऱ्या स्वतःच्या मुलाला अधिक मार्क्स मिळावेत म्हणून आरोपी संजय राठोड याने हा गुन्हा 22 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 दरम्यान केला होता. याबाबत 23 मार्च 2026 रोजी वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात नमूद कलमानुसार 7 वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद असल्यामुळे आरोपी संजय राठोड ला अटक होणार होती. मात्र अटक टाळण्यासाठी आरोपी संजय राठोड ने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. अटकपूर्व अर्जाला अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी जोरदार हरकत घेत पुढील मुद्दे मांडले.

आरोपी संजय राठोड यांची सदर गुन्ह्याचे घटनास्थळी ड्यटुी नसतांना देखील ते घटनास्थळी प्रत्यक्ष हजर असल्याचे सदर गुन्ह्यात प्राप्त सीसीटीव्ही चे स्क्रीन शॉट आधारे निष्पन्न झालेलेआहे. आरोपीने गुन्हयातील परीक्षार्थी ( अर्जदार यांचा मुलगा) यास अवैधरीत्याउत्तरपत्रका व पुरवणी देण्यासाठी इतर कोणत्या
व्यक्तीची मदत घेतली, त्यामागील संगनमत काय होते ? तसेच त्या गैरप्रकारात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची नावे आणि भूमिका स्पष्ट करणे अद्याप बाकी आहे.

आरोपीने गुन्हा करण्यासाठी इतर सहआरोपी अथवा व्यक्तीिं शी संगनमत करूनत्यांना आर्थिक मोबदला, रोख रक्कम किंवा इतर लाभ दिला आहे काय, तसेच सदर गुन्ह्याचे नियोजन, समन्वय व अंमलबजावणी करण्यासाठी कोणते मोबाईल क्रमांक, व्हॉट्सअप कॉलर् , इंटरनेट लिंक संदेश अथवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर केला आहे, याबाबत माहीती घेऊन सविस्तर तपास करायचा आहे.सदर आरोपी, गुन्ह्यातील परीक्षाथी तसेच तपासादरम्यान निष्पन्न होणाऱ्या इतर व्यक्तीिंचे नैसर्गिक हस्ताक्षर, स्वाक्षरी व नमुना हस्ताक्षर प्राप्त करून, गुन्हयातील उत्तरपत्रिका, पुरवणी उत्तरपत्रिका व इतर वादग्रस्त दस्तऐवजांवरील हस्ताक्षराशी शास्त्रीय तलुनाकरण्यासाठी प्रयोगशाळेतील हस्ताक्षर तज्जज्ञािंकडे पाठववणे आवश्यक आहे. सदर वैज्ञानिक पुरावा संकलित करण्यासाठी अर्जदार आरोपीची सखोल चौकशी आवश्यक असून, जामीन मंजूर झाल्यास तपासावर परीणाम होण्याची दाट शक्यता आहे. सदर आरोपीने गुन््यातील परीक्षाथी ( आरोपी यांचा मुलगा ) यास ज्यापुरवणी उत्तरपत्रकेवर उत्तरे दिली अथवा लिहून घेतली, ती पुरवणी उत्तरपत्रिका कोठूनप्राप्त केली ? ती अधीकृतरीत्या परीक्षा केंद्रातून मिळवली की अन्य कोणत्या मार्गाने मिळवली, तसेच ती बनावट स्वरूपात छापून घेतली आहे का ? याबाबत सखोल तपास करणे आवश्यक आहे. तसेच शासकीय परीक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या पुरवणी उत्तरपपत्रिकांचाअनधीकृत साठा कोठे करून ठेवला आहे काय ? त्यामध्ये इतर कोणाचा सहभाग आहे काय? याबाबत तपास करून संबंधित मुद्देमाल जप्त करणेआवश्यक आहे.अर्जदार आरोपी हे गुन्हा घडलेल्या दिवशी परीक्षा केंद्र परीसरात इतर आरोपी, (
उत्तरपत्रीका पररक्षाथी यास पुरवीणारे ) संबंधीत व्यक्ती यांचे संपर्कात आल्याचे CCTV फुटेजवरून दिसत आहे. तसेच अर्जदार आरोपी हा परीक्षा कें द्राबाहेरील बाथरूमजवळ संबंधित व्यक्तीिंना भेटताना दसून येत आहे. सदर अर्जदार आरोपीने गुन्ह्यातील इतर आरोपी यांना परीक्षा कक्षाबाहेर
बोलावण्यासाठी अथवा त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी कोणते मोबाईल क्रमांक, WhatsApp Calling, Voice Calling, SMS, WhatsApp सदेश कींवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमाचावापर के ला, त्याबाबतचे पुरावे संकलित करणे, CDR, IPDR व इतर पुरावे प्राप्त करणेआवश्यक आहे. सदर अर्जदार आरोपी हा स्वतः मुख्याध्यापक असल्याने शैक्षणिक क्षेत्रातील त्याच्या प्रभावाचावापर करून साक्षीदार, विद्यार्थी व इतर कामगार यांच्यावर दबाव आणून तपासात अडथळा
करण्याची दाट शक्यता आहे.अर्जदार आरोपीकडून परीक्षा अभिलेख, उत्तरपत्रिका, ड्यटुी रेकॉडिंग, CCTV किंवा इतर पुराव्यंमध्ये हस्तक्षेप अथवा पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे. सदर गुन्हा हा संपुर्ण परीक्षा व्यवस्थेवर परिणाम करणारा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे.

सदर अर्जदार आरोपीने गुन्हा घडत असताना परीक्षा कें द्रामध्ये कोणत्या व्यक्तीच्या मदतीनेअनधीकृतरीत्या प्रवेश केला, याबाबत सखोल तपास करणेआवश्यक आहे.सदर अजगदार आरोपीने गुन्ह्यातील परीक्षार्थीस उत्तरपत्रिका, पुरवणी उत्तरपत्रिका अथवा इतरपरीक्षा साहीत्य प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणामार्फत उपलब्ध करून दिले, त्या व्यक्तींचीओळख निश्चित करून त्यांचा सहभाग सहभाग करणे बाकी आहे.सदर अर्जदार आरोपीने गुन्हा करण्यापूवी, गुन्हा घडत असताना व त्यानंतर इतर आरोपिंशी प्रत्यक्ष भेटी, मोबाईल कॉल, WhatsApp Calling, WhatsApp Chat, SMS, व्हीडीओ कॉल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे संपर्क साधला आहे काय, याबाबत CDR, IPDR, CAF, SDR, लोक शन व इतर तांत्रिक पुरावे प्राप्त करून तपास करणेआवश्यक आहे.

अर्जदार आरोपीने गुन्हा करताना वापरलेला मोबाईल, SIM Card, WhatsApp Account, E-mail Account, Cloud Backup तसेच इतर डिजीटल उपकरणे जप्त करूनत्यामधील डिजीटल पुरावे प्राप्त करणे आवश्यक आहे.सदर अर्जदार आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले लेखन साहीत्य, पेन, उत्तरपत्रिका, पुरवणी उत्तरपतत्रिका, कार्यालयीन अभिलेख तसेच इतर संबंधीत मुद्देमाल हस्तगत करून जप्त करणे
आवश्यक आहे.

सदर अर्जदार आरोपीने उत्तरपत्रिका व पुरवणी उत्तरपत्रिके मध्ये कोणत्या ठीकाणी, कोणत्या वेळी व कोणाच्या उपस्थितीत लेखन के ले, याबाबत घटनाक्रम निश्चित करून तपास करायचा आहे.आरोपी संजय राठोडने गुन्ह्यातील इतर आरोपींना कोणत्या सचूना दिल्या, त्यांच्यामध्ये कामाचेवाटप कसे करण्यात आले व प्रत्येकाची भूमीका काय होती ? याबाबत माहीती घेऊन तपास करायचा आहे.सदर गुन्हा हा पूर्वनियोजित स्वरूपाचा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून, त्यामागील संपूर्ण कट, नियोजन, आर्थिक व्यवहार, संपर्क व्यवस्था व प्रत्येक आरोपीची भूमिका निश्चित करून तपास करायचा आहे. आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना तपासी अधिकाऱ्यांनी संशयित आरोपी संजय राठोड याला ची नोटीस बजावलेली नाही याचा फायदा घेत सुप्रीम कोर्टाचा दाखला देत जामीन मंजूर करण्यासाठी बचाव केला. मात्र सरकारी वकील रुपेश देसाई यांनी शिक्षकी पेशात स्वतः मुख्याध्यापक असलेल्या आरोपीने स्वतःच्या मुलाला अधिक मार्क्स मिळण्यासाठी केलेलं गैरकृत्य हे शिक्षकी पेशाची समाजात प्रतिमा मलिन करणारे आहे, शासन कॉपीसारख्या प्रकाराला आळा घालत असताना स्वतः शिक्षकाने कॉपी प्रमोटिंग चा केलेला प्रकार हा सामाजिक मूल्ये घसरवणारा असल्याचे नमूद करून आरोपी संजय राठोड चा जामीन अर्ज फेटाळण्यासाठी ऑर्गयुमेंट केले.

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरून प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ. देशपांडे यांनी आरोपी संजय राठोड याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

error: Content is protected !!