१७ वर्षाखालील मुलांच्या संघाची जिल्हास्तरीय सर्धेसाठी निवड
खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग माध्यमिक शालेय क्रीडा विभाग यांच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत क्रिकेट या खेळात खारेपाटण येथील नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या १७ वर्षांखालील संघाने यश संपादन केले असून या संघाची पुढे होणाऱ्या जिल्हास्तरीय सर्धेसाठी निवड झाली आहे.
कणकवली येथे पार पडलेल्या या क्रिकेट स्पर्धेत नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी कासार्डे माध्यमिक हायस्कूल च्या संघावर अंतिम सामन्यात मात करत विजय संपादन केला असून या संघाची आता जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक सुयोग राजपकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या अभिनंदनीय निवडी बद्दल व यशा बद्दल नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष रघुवीर राणे,उपाध्यक्ष – परवेज पटेल,सचिव – राजेंद्र ब्रम्हदंडे,तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका नीलम डांगे यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांच्या पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.












