नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त वैभववाडीत काव्यवाचन

१५ ऑक्टोबरला आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : कवी पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० या वेळेत महाविद्यालयाच्या सभागृहात काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी साहित्यविश्वात कष्टकरी, कामगार आणि सामान्य माणसाच्या संघर्षाला आपल्या कवितेतून प्रभावीपणे मांडणाऱ्या नारायण सुर्वे यांच्या साहित्यिक योगदानाचा नव्या पिढीला परिचय व्हावा, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

नारायण सुर्वे हे वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र असून, त्यांच्या कवितांनी मराठी साहित्याला सामाजिक वास्तवाची समर्थ अभिव्यक्ती दिली. त्यांच्या साहित्याचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये काव्यवाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच साहित्याविषयी अभिरुची विकसित व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमास तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे स्थानिक समिती सचिव प्रमोद रावराणे यांनी केले आहे.

error: Content is protected !!