खारेपाटण (प्रतिनिधी) : तळेरे खारेपाटण ते राजा पूर या राष्ट्रीय महामार्गावर एस टी बसेस ची संख्या फार कमी करण्यात आल्यामुळे येथील प्रवासी वर्गाला याचा खूप त्रास सहन करावा लागत असून,या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषद सदस्य सौ प्राची ईसवलकर यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभाग यांची कणकवली कार्यालय येथे भेट घेऊन राजापूर डेपोची बंद करण्यात आलेली राजापूर – सावंतवाडी ही एस टी गाडी पूर्ववत सुरू करावी अशी लेखी निवेदन देऊन मागणी केली.
यावेळी पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे,राजेश जाधव,खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव,माजी सरपंच श्री रामकांत राऊत आदी खारेपाटण विभागातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.दरम्यान राजापूर ते तळेरे या ३६ किलोमीटर प्रवासात खारेपाटण हे महत्त्वाचे शहर अडून येथील प्रवाशांना पुढील प्रवासाठी पुरेशा एस टी गाड्या उपलब्ध नाहीत.त्यामुळे प्रवाशाचा खूप खोळंबा होत असून एस टी महामंडळ फक्त बघ्याची भूमिका घेत आहे.
विभाग नियंत्रकांना देण्यात आलेल्या निवेदनात खारेपाटण बस स्थानकातून सकाळी ९.३० वाजता सुटणारी राजापूर – सावंतवाडी ही बस पुन्हा सुरू करावी.कारण ८.३० वाजता सुटणारी रत्नागिरी – सावंतवाडी ही.गाडी सुमारे दोन तासाने म्हणजे १०.३० खारेपाटण येत असल्याने पुढील कामासाठी प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक व सरकारी – खाजगी कर्मचारी वर्ग यांना तासन तास बस येण्याची वाट पाहत ताटकळत राहावे लागत आहे.तरी या निवेदनाव्दारे प्रवासी वर्गाची होणारी गैरसोय दूर करून राजापूर – सावंतवाडी ही गाडी सुरू करावी अशी करण्यात आली आहे.












