करूळमध्ये दुर्दैवी घटना! शेतात जाताना पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा ८ तासांनंतर मृतदेह सापडला

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ गावठाण येथील शेतकरऱ्याचा शेतावर जातांना पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदानंद हरिश्चंद्र कदम वय ६० असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. सह्याद्री जीव रक्षक टीमच्या सदस्यांनी राबविलेल्या  शोध मोहिमेनंतर तब्बल ८ तासाने घटनास्थळापासून सुमारे ४ की. मी अंतरावर त्याचा मृतदेह सापडला.

गेले दोन दिवस तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदीला पूर आला होता. मंगळवारी सकाळी मयत सदानंद कदम हे नदीपलीकडे असलेल्या शेतात जाण्यासाठी घरातून बाहेर पडले.  घरापासून काही अंतरावर नदी आहे. नदी पार करतांना त्यांचा पाय घसरला. ते पुराच्या प्रवाहात वाहून गेले. मात्र शेतात किंवा घरी आले नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केले. तर गावातील सह्याद्री जीव रक्षक टीम यांनी शोध मोहीम राबविण्यास सुरुवात केली दरम्यान वैभववाडी पोलीस तसेच वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, नायब तहसीलदार दिलिप पाटील, मंडळ अधिकारी श्री गवस, तलाठी शुभांगी साबळे, ग्रामसेवक शशिकांत गुरव, पोलीस अधिकारी फकरुद्दीन आगा, पोलीस हवालदार सी. ए. माने, आर. बी. तळसकर, मोहन राणे, जितेंद्र कोलते, संदीप राठोड घटनास्थळी हजर होते.

दरम्यान सह्याद्री जीव रक्षक टीमच्या सदस्यांनी पुराच्या पाण्यात उतरून शोध मोहीम राबविली. तब्बल आठ तासाच्या शोध मोहिमेनंतर घटनास्थळापासून सुमारे चार की मी अंतरावर करूळ एडगांव सीमेलगत नदी किनारी एका झूडपात कदम यांचा मृतदेह सापडला. या शोध मोहिमेत सह्याद्री जीव रक्षक टीमचे सदस्य हेमंतपाटील,नरेंद्र कोलते,राजेंद्र वारंग, विजय सावंत,अमर शिंदे, रवींद्र चव्हाण, रघुनाथ चव्हाण, आनंद शिंदे, सत्यवान सरफरे, पांडुरंग शिवगण, संजय कदम, सत्यविजय मोरे,विजय पवार,  तुकाराम पवार, मंगेश शिवगण, हिंदुराव पाटील, सचिन पाटील, सुरज शिंदे यांनी पुराच्या पाण्यात उतरून शोधमोहिमेत सहभाग घेतला. मयत सदानंद कदम यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, भाऊ,भाऊजय पुतणे असा परिवार आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, वैभववाडी सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, जि. प. सदस्य मनोज रावराणे, श्रावणी रावराणे, बंडया मांजरेकर, पं स. सदस्य सुवर्णा संसारे, मंगेश लोके, सरपंच नरेंद्र कोलते, माजी सरपंच हिंदुराव पाटील, अरुण कदम, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब कोलते, पोलीस पाटील उदय कदम व सचिन पाटील घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तसेच त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला.

error: Content is protected !!