दहिबांव येथे सिद्धिविनायक रिअल इस्टेटतर्फे १३९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

गरजू विद्यार्थ्यांना सातत्याने मदत करणे हेच आमचे ध्येय – किशोर रेवडेकर

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील दहिबांव येथील श्री महादेश्वर मंदिर येथे सिद्धिविनायक रिअल इस्टेट, टिळकनगर, चेंबूर यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे उत्साहात वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे आणि आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, या उदात्त उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमात मिठबाव नं. १, मिठबाव फाटकवाडी, मिठबाव शेगुलवाडा, दहिबाव नं. १, दहिबाव प्रभूवाडी, नारीग्रे नं. १ व २ यांसह दहिबाव व मिठबाव केंद्र गटातील विविध शाळांमधील एकूण १३९ विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल व अन्य आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याशिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

सिद्धिविनायक रिअल इस्टेट, टिळकनगर, चेंबूर या संस्थेचे संचालक किशोर रेवडेकर हे गेली अनेक वर्षे सातत्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. पूर्वी हा उपक्रम केवळ दहिबाव केंद्रातील शाळांपुरता मर्यादित होता, मात्र आता याचा विस्तार करून मिठबाव केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनाही याचा लाभ दिला जात आहे

संस्थेचे संचालक किशोर रेवडेकर यांनी, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सतत मदत करत राहण्याची आपली कटिबद्धता व्यक्त केली असून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढत असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना केंद्रप्रमुख जगदीश शिंदे म्हणाले की, “जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. अशा परिस्थितीत शाळेचा विद्यार्थीपट टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान बनले आहे. मात्र पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश द्यावा, त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.” सिद्धिविनायक रिअल इस्टेटच्या सामाजिक बांधिलकीमुळे विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य मिळत असून पालकांचा विश्वास दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद करत हा उपक्रम समाजासाठी आदर्श असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास सिद्धिविनायक रिअल इस्टेटचे संचालक किशोर रेवडेकर सचिव संतोष माने, सुनील नाईक, दहिबावचे सरपंच सचिन नाचणकर, माजी सरपंच शुभांगी राणे, सदस्य विजय परब, अभया शेटये, विजया दहिबावकर, बाळा शेट्ये, नरेश नार्वेकर, बंडू टेंबुलकर, दाजी घाडी, परेश रुमडे, केंद्रप्रमुख जगदीश शिंदे, मुकेश पारकर, मिठबाव बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सूरज पोराटे,गिरीष चव्हाण आदींसह विविध शाळांचे शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव बिर्जे, भागवत बुधकर
यांनी केले तर आभार प्रदर्शन शुभांगी राणे यांनी व्यक्त केले,

error: Content is protected !!