(ब्युरो न्युज) : उकाड्यानं हैराण झालेल्या प्रत्येकासाठीच ही अत्यंत मोठी आणि तितकीच आनंदाची बातमी. कारण, आता अवघ्या काही दिवसांतच हा उकाडा तुमची पाठ सोडणार आहे. थोडक्यात लांबणीवर गेला म्हणता म्हणजा आता मान्सून पुढच्या 24 तासांत अंदमान निकोबार बेट समुहात दाखल होत असल्याची माहिती IMD नं दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच आयएमडी आणि स्कायमेट या दोन्ही संस्थांकडून यंदाच्या मान्सूनची तारीख लांबणीवर पडल्याचं सांगण्यात आलं होतं. पण, त्यातच आता मान्सून अंदमानात वेळतच दाखल होत असल्याचं स्पष्ट होत आहे. इथून पुढं म्हणजेच केरळच्या किनारपट्टीवर मान्सून 3 ते 4 जूनपर्यंत दाखल होईल. आणि त्यानंतरच काही दिवसांनी तो महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचणार आहे.दरम्यान, प्रवासाच्या पहिल्याच टप्प्यात मान्सून निकोबार, अंदमानचा दक्षिण भार आणि बंगालच्या उपसागर क्षेत्राला व्यापणार आहे. परिणामी पुढच्या पाच दिवसांमध्ये केरळच्या विविध भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या येण्याची बातमी मिळेल असं सांगण्यात येत आहे. देशभरात सध्याच्या घडीला असणारं तापमान पाहता पर्वतीय क्षेत्र वगळता बहुतांश भागांमध्ये आर्द्रतेचं प्रमाणही जास्त असेल.












