आ. नितेश राणेंनी दिला निधी ; संतोष कानडे यांचा पाठपुरावा
कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील पियाळी करमळकर वाडी ते जैन मंदिर व वंजारे वाडी येथील गणेश घाट रस्ता डांबरीकरण साठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.यासाठी कणकवली माजी उपसभापती संतोष कानडे यांनी पाठपुरावा केला होता. या कामाच्या भूमी पूजन वेळी सरपंच बंड्या पन्हाळकर उपसरपंच संजय ढवन ग्रामपंचायत सदस्य विजय मुरकर बूथ अध्यक्ष बाबू घाडी, रवी करमळकर, दत्ताराम गवळी, गांधी बाबु, तुषार गुरव, राजेंद्र पवार, पोलीस पाटील सुनील पवार, गणेश पेडणेकर, लक्ष्मण पवार, सखाराम गवळी, यांसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.













