सार्वजनिक बांधकाम खात्याने गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ दुरुस्ती करावी – चौके माजी सरपंच पी. के. चौककर यांची मागणी
चौके (प्रतिनिधी) : मालवण कसाल मुख्य रस्त्यावर चौके ते आनंदव्हाळ मार्गावर भूमिगत 33 केवी वीज वाहिनीची केबल टाकताना चार ठिकाणी रस्ता फोडून चर मारून केबल टाकण्यात आली. मात्र संबंधित कॉन्ट्रॅक्टरने सदरचे चर मातीने बुजवल्याने पावसात या चरांवरील माती वाहून गेल्याने खड्डे पडले आहेत या मार्गावर रोज ये जा करणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या प्रमाणावर या खड्ड्यांचा त्रास होत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही तरी सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण यांनी याची तात्काळ दखल घेऊन खड्डे सिमेंट काँक्रीट किंवा डांबराने लवकरात लवकर बुजवावेत अशी मागणी चौके माजी सरपंच पी. के.चौकेकर यांनी केली आहे.












