पतंजली योगपीठ भारत स्वाभिमान न्यास ची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी डॉ तुळशीराम रावराणे यांची निवड

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पूज्य स्वामी परमार्थ देवजी, मुख्य केंद्रीय प्रभारी, पतंजली परिवार, हरिद्वार यांच्या निर्देशानुसार पतंजली योगपीठ परिवार, सिंधुदुर्गची विस्तारित अधिकृत जिल्हा कार्यकारिणी महाराष्ट्र पश्चिम राज्य कार्यकारिणीच्या वतीने नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

या कार्यकारिणीत भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी डॉ. तुळशीराम वा. रावराणे, जिल्हा सहप्रभारी रावजी दुलाजी परब, पतंजली योग समिती जिल्हा प्रभारी विद्याधर वसंत पाटणकर व दत्तात्रय नरहरी निखार्गे, सोशल मीडिया जिल्हा प्रभारी योगेश बाबाजी येरम, जिल्हा कोषाध्यक्ष लक्ष्मण जगन्नाथ पावसकर, किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी सुभाष गोवेकर, सहप्रभारी रवींद्र गणपत पावसकर, जिल्हा महामंत्री विकास ज्ञानदेव केरकर आणि युवा भारत जिल्हा प्रभारी डॉ. श्री. प्रशांत परब यांचा समावेश आहे.

तालुकानिहाय कार्यकारिणी

सावंतवाडी तालुका : भारत स्वाभिमान तालुका प्रभारी सर्वानंद दळवी, पतंजली योग समिती तालुका प्रभारी बाबली गवंडे, किसान सेवा समिती तालुका प्रभारी नारायण राणे आणि सोशल मीडिया तालुका प्रभारी लक्ष्मण राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कुडाळ तालुका : भारत स्वाभिमान तालुका प्रभारी योगेश गणपत गवंडे, पतंजली योग समिती तालुका प्रभारी प्रमोद नंदादीप नाईक, युवा भारत तालुका प्रभारी सिद्धेश बाळकृष्ण नाईक, किसान सेवा समिती तालुका प्रभारी गुरुनाथ दत्ताराम सावंत, सोशल मीडिया तालुका प्रभारी नारायण गोविंद कोरगांवकर, संघटन मंत्री महेश सहदेव गावडे, कोषाध्यक्ष रामचंद्र गोपाळ कामुलकर, तसेच किसान सेवा समिती सहप्रभारी विजय दिगंबर आरोलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कणकवली तालुका : भारत स्वाभिमान तालुका प्रभारी प्रकाश जगन्नाथ कोचरेकर, पतंजली योग समिती तालुका प्रभारी सखाराम लक्ष्मण सपकाळ, युवा भारत तालुका प्रभारी किसन ठोंबरे, किसान सेवा समिती तालुका प्रभारी प्रकाश जगन्नाथ पडवळ आणि सोशल मीडिया तालुका प्रभारी प्रमोद लिमये यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय कणकवली तालुक्यात भारत स्वाभिमान सहप्रभारी प्रभाकर सोमा सावंत, पतंजली योग समिती सहप्रभारी रवींद्र अर्जुन बागवे, किसान सेवा समिती सहप्रभारी संजय नारायण राणे आणि सोशल मीडिया सहप्रभारी विजय शंकरराव पोवार यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

महिला पतंजलीचे जिल्हास्तरीय कार्य रश्मी रामचंद्र आंगणे, महिला पतंजली जिल्हा प्रभारी, यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

योग, आयुर्वेद व स्वदेशीबाबत जनजागृतीवर भर

नवीन जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका तसेच गावपातळीपर्यंत योग, प्राणायाम, आयुर्वेद, स्वदेशी आणि भारतीय शिक्षण व्यवस्था यांसारख्या विविध विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे. पूज्य स्वामी रामदेवजी आणि पूज्य आचार्य बालकृष्णजी यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा निरोगी आणि सशक्त करण्यासाठी विविध ठिकाणी सुरू असलेल्या निःशुल्क योगकक्षांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

युवक-युवतींना योग प्रशिक्षक बनवून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विशेष योग शिक्षक प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्याचाही मानस जिल्हा पतंजली परिवाराने व्यक्त केला आहे.

पतंजलीच्या विविध सेवा प्रकल्पांची माहिती मिळविण्यासाठी ७०८३६०२५०४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!