त्रिंबक तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी कविता त्रिंबककर; सचिवपदी पोलीस पाटील गणेश गोसावी

ग्रामसभेत एकमताने निवड; मावळत्या पदाधिकाऱ्यांकडून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडे पदभार

आचरा (प्रतिनिधी) : त्रिंबक गावच्या ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी कविता किशोर त्रिंबककर, तर सचिवपदी पोलीस पाटील गणेश विलास गोसावी यांची एकमताने निवड करण्यात आली.

ग्रामसभेत दरम्यान तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक कोण आहे, अशी विचारणा करण्यात आली. यावेळी कविता किशोर त्रिंबककर यांनी अध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ग्रामस्थांनी एकमताने त्यांच्या नावाला मंजुरी देत त्यांची अध्यक्षपदी निवड केली.

अध्यक्षपदाची निवड निश्चित झाल्यानंतर मावळते अध्यक्ष अशोक बागवे यांनी कविता त्रिंबककर यांचे अभिनंदन करून समितीचा पदभार त्यांच्याकडे सोपविला. तसेच सचिवपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस पाटील सीमा घाडीगावकर यांनी नवनिर्वाचित सचिव पोलीस पाटील गणेश गोसावी यांच्याकडे पदभार सुपूर्द केला.

यावेळी ग्रामस्थांनी नवनिर्वाचित अध्यक्ष कविता त्रिंबककर व सचिव पोलीस पाटील गणेश गोसावी यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. गावातील तंटे सामोपचाराने मिटवून सामाजिक सलोखा व एकोपा टिकविण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी प्रभावीपणे काम करतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!