कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी फ्रान्सिस उर्फ राजू तमास फर्नांडिस यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वरवडे सरपंच करुणा घाडीगावकर यांच्या अध्यक्षतेखाली 25 ऑगस्ट रोजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीसाठी वरवडे ग्रामपंचायत सभागृहात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सर्वानुमते राजू फर्नांडिस यांची एकमुखी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी सरपंच करुणा घाडीगावकर, उपसरपंच अमोल बोंद्रे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, तंटामुक्ती समिती चे माजी अध्यक्ष हनुमंत बोंद्रे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. फ्रान्सिस उर्फ राजू हे वरवडे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य असून गावातील विविध सामाजिक कार्यांत त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असतो.त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.













