आचरा (प्रतिनिधी) : श्रावण ग्राम तंटामुक्ती समितीचे नवे अध्यक्ष अनंत राऊत यांची एकमताने २५ ऑगस्ट रोजी, श्रावण ग्रामपंचायत येथील ग्रामसभेत एकमताने निवड करण्यात आली. अनंत गोविंद राऊत यांचे, सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सरपंच नम्रता मुद्राळे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
अनंत गो. राऊत हे एक योगशिक्षक आहेत. आरोग्याला उपयुक्त असे योगा – प्राणायम ज्ञान राऊत यांच्याकडे आहे. अध्यक्ष अनंत राऊत यांचा शांत स्वभाव व समजुतदार पणा असल्याने गावातील तंटे सामंज्यस्याने गावातच मिटवून, ग्रामस्थांना योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा गावातील ग्रामस्थांना आहे. ग्रामस्थांच्या अपेक्षेप्रमाणे गावातील तंटे गावातच मिटवण्याचे काम, आपण करु व शासनाच्या धोरणाप्रमाणे गावात शांतता टिकवण्याचे कार्य प्रामाणिकपणे करु. असे राऊत यांनी यावेळी सागितले.
यावेळी श्रावण उपसरपंच व गावप्रमुख दुलाजी परब, माजी सरपंच प्रशांत परब, माजी सदस्य ॲड. राजन यादव, प्रकाश परब, पोलिसपाटील धाकु दळवी, गवळीवाडी पोलिसपाटील वैभव यादव, भाऊ राऊत, विजय गवळी, विश्वास यादव, प्रकाश यादव, महिला बचत समुह गट प्रमुख संचिता घाडी, व ग्रामस्थ उपस्थित होते.












