पक्षनिरीक्षक म्हणून स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून केले मार्गदर्शन
कणकवली (प्रतिनिधी) : राजस्थानच्या भरतपूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार चंद्रकांत बावनकुळे यांच्या समवेत भाजपा आमदार प्रमोद जठार हे पक्षनिरीक्षक म्हणून सहभागी झाले आहेत. भरतपूर येथे आमदार जठार यांनी नामदार बावनकुळे यांच्यासोबत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भरतपूर येथे भारतीय जनता पक्षाच्या विजयासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करून विविध भागांत प्रचार केला. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह हा निश्चितच भाजपच्या विजयाचा विश्वास अधिक दृढ करणारा आहे.
सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या विचाराने भारतीय जनता पक्ष अधिक बळकट होत आहे.











