मालवण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्षा सरोज परब यांचे दुःखद निधन झाल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी मसूरे मर्डे येथे रविवारी सायंकाळी शिवाजी परब कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष सौ. सरोज शिवाजी परब यांचे शनिवारी रात्री हृदय विकाराने निधन झाले. पालकमंत्री नितेश राणे यांनी सांत्वन करताना परब कुटुंबीयांच्या दुःखात सर्व सहभागी असल्याचे सांगितले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जि. प. सदस्या सौ. क्षमा हडकर, वेरली सरपंच धनंजय परब, घुमडे उपसरपंच राजू सावंत, मसुरे माजी सरपंच संदीप हडकर, माजी उपसरपंच राजेश गावकर, मालोंड माजी उपसरपंच जितेंद्र परब, राहुल परब, गणेश परब, उमेश माने, रोहेश गावकर, तात्या हिंदळेकर, पुरुषोत्तम शिंगरे, यासिन सय्यद आदी उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणेंनी केले सरोज परब कुटुंबियांचे सांत्वन












