पोक्सो च्या गुन्ह्यातील आरोपी मिलिंद पुजारे चा जामीन अर्ज नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): 15 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करून तीला गर्भवती केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी मिलिंद मालोजी पुजारे ( रा.पुरळ , ता देवगड ) याचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. विवाहित असलेला नराधम आरोपी मिलिंद पुजारे याने पीडित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यातून पीडित अल्पवयीन युवती गर्भवती राहिली.याबाबत पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी मिलिंद पुजारे विरोधात पोलीस ठाण्यात आयपीसी तसेच पोक्सो नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी मिलिंद पुजारे याला अटक करण्यात आली होती. आरोपी पुजारे ने दाखल केलेल्या जामीन अर्जाला हरकत घेताना सरकारी वकील घडलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, पीडित युवती अल्पवयीन असून 3 महिन्यांची गर्भवती असल्याने तिला व तिच्या कुटुंबियांना आरोपिकडून धोका निर्माण होऊ शकतो, जामिनावर सुटल्यास साक्षीदारांवर आरोपी दबाव आणू शकतो, या गुन्ह्यात अधिक पुरावे गोळा करणे बाकी आहे हे मुद्दे न्यायालयासमोर मांडले.सरकारी वकील देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी मिलिंद पुजारे चा जामीन अर्ज फेटाळला.

error: Content is protected !!