प्राणसहजीवन संस्थेच्या दातृत्वामुळेच वह्या वाटप उपक्रम यशस्वी– भगवान लोके

कोळोशी हायस्कुल येथे प्राण जीवन सहयोग संस्था व जनसेवा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने वह्या वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात आई, वडील, शिक्षकांप्रती आदर ठेवावा. गुरुरुपी दिलेल्या ज्ञानाचा उपयोग करुन आपल्या जीवनात प्रगती करावी. गेल्या आठ दिवस नांदगाव पंचक्रोशीतील सर्व गावांमधील शाळांध्ये मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पडले. त्यामागे ख-या अर्थाने प्राणसहजीवन संस्थेच्या दातृत्व महत्वाचे होते. त्यामुळे आपलेपर्यंत वह्या वाटप करत शैक्षणिक हातभार लावता आला, असे प्रतिपादन कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी केले.

शिक्षण प्रसारक मंडळ कोळोशी-हडपिड (मुंबई) संचलित
माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपीड येथे प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष , सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांच्या सहकार्याने व शिवशक्ती मल्टिस्पेशालिटी सर्व्हिसेस संचलित जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष, पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांच्या पुढाकाराने नांदगाव पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , हायस्कुलच्या मुख्याख्यापिका अश्विनी गर्जे, उपसरपंच सचिन परब, पत्रकार उत्तम सावंत, विजय डामरे, अनिल नरे, सामाजिक कार्यकर्ते मनमोहन कुलकर्णी, आदींसह शिक्षक व शालेय कर्मचारी उपस्थित होते.

सरपंच चंद्रकांत डामरे म्हणाले,विद्यार्थ्यांनी जीवनात चांगले संस्कार घेवुन शिक्षण क्षेत्रात यश मिळवावे. प्राणजीवन संस्थेचे संदिप चौकेकर यांचे आम्ही आभार मानतो. प्रास्ताविक पत्रकार उत्तम सावंत तर आभार मुख्याध्यापिका अश्विनी गर्जे यांनी मानले.

error: Content is protected !!