विजय क्रीडा मंडळ भांडूप मुंबईचे अध्यक्ष संतोष कासले यांचे ८८ वे रक्तदान….!

सामाजिक बांधिलकीचा आदर्श

आचरा (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी जपत आणि गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे या उद्देशाने विजय क्रीडा मंडळ, भांडूप मुंबईचे अध्यक्ष संतोष कासले यांनी आपल्या आयुष्यातील ८८ वे रक्तदान केले.

मुंबई येथील बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयाच्या रक्तकेंद्रात त्यांनी २९ ऑगस्ट २०२६ रोजी रक्तदान केले. त्यांच्या या रक्तदानाची नोंद मुंबई महानगरपालिकेच्या रक्तदान प्रमाणपत्रात करण्यात आली आहे.

नियमित रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदतीचा हात देत संतोष कासले यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. रक्तदान हे केवळ सामाजिक कार्य नसून एखाद्याचे प्राण वाचविण्याचे महान कार्य आहे, या भावनेतून त्यांनी सातत्याने रक्तदानाची परंपरा जपली आहे. स्वतःला वाहून घेऊन सेवा करण्याचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

८८ वेळा रक्तदान करण्याचा हा विक्रम त्यांच्या सेवाभावी वृत्तीची आणि सामाजिक बांधिलकीची साक्ष देणारा आहे. श्री कासले मुळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!