कणकवली (प्रतिनिधी) : श्रावण मासानिमित्त प्रभाग क्रमांक १० मधील महिलांसाठी एक दिवसीय देवदर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीचे नियोजन शीतल मांजरेकर यांनी केले होते. महिलांनी या सहलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घेत आनंद लुटला.
सहलीचा शुभारंभ सकाळी १० वाजता नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी प्रदीप मांजरेकर उपस्थित होते.
सहलीदरम्यान महिलांनी रेडी येथील गणपती मंदिर, माऊली मंदिर, आरवली येथील वेतोबा मंदिर, सातेरी मंदिर तसेच वेंगुर्ला येथील सागरेश्वर मंदिर येथे दर्शन घेतले. श्रावण महिन्याच्या निमित्ताने आयोजित या धार्मिक सहलीमुळे महिलांना भक्तिमय वातावरणात विविध देवस्थानांचे दर्शन घेता आले.
दिवसभराच्या या सहलीत महिलांनी एकमेकींसोबत आनंदाचे क्षण अनुभवत मनमुराद आनंद लुटला. सहलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी महिलांनी शीतल मांजरेकर यांचे कौतुक केले.











