वैश्य समाज पतसंस्थेची गणेश चतुर्थी निमित्त १०.३०% व्याजदराची “लंबोदर ठेव” योजना जाहीर

महीला व जेष्ठ नागरीकांना मिळणार १०.४५% व्याज

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : १९ ऑक्ओबर १९९१ रोजी स्थापन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित, फोंडाघाट या पतसंस्थेस आज जवळ जवळ ३५ वर्षे पूर्ण झाली असून गेल्या साडेतीन दशकात संस्थेने गांहकांना अविरत आणि पारदर्शक सेवा दिली आहे. काळानुरूप बदलत संस्थेने संपूर्णपणे आधुनिक तत्रज्ञानाचा अंगीकार केला असून संस्था आज आपल्या ग्रहकांना RTGS/NEFT/IMPS, त्याचप्रमाणे SMS अलर्ट सुविधा, WHATS APP BANKING सुविधा, QR Code सुविधा, डोअर स्टेप बैंकिंग सुविधा अशा अनेक प्रकारच्या सुविधा देत आहे. वैश्य समाज पतसंस्थेने गणेश चतुर्थीचे औचित्य साधुन आपल्या ग्रहकांसाठी अत्यंत फायदेशिर अशी १०.३० % व्याजदराची “लंबोदर ठेव” योजना जाहीर केली असून यामध्ये महीला आणि जेष्ठ नागरीकांना हा व्याजाचा दर १०.४५% इतका मिळणार आहे. ही योतना १ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली असून ती ग्रहकांसाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत सुरू राहील. परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम साधत, गाहकांच्या प्रगतीत हातभार लावणा-या वैश्य समाज पतसंस्थेच्या या नव्या ठेव योजनेला ग्राहकांकडून पहील्याच दिवशीपासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चालू आर्थिक वर्षात ही योजना मर्यादित कालावधीसाठी खुली राहणार असल्याने, जास्तीत जास्त ग्रहकांनी आणि गुंतवणूकदारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेवून आपल्या पैशाची सुरक्षित व फायदेशिर गुंतवणूक करावी, असे आवाहन संस्थेचे संचालक मंडळ तसेच अध्यक्ष गणपत वळंजू आणि मुख्यकार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!