रुद्र नारायण मोरजकर याचे घवघवीत यश; महाराष्ट्र संघात निवड

बांदा (प्रतिनिधी) : नुकत्याच अहिल्यानगर येथे टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र १७ वर्षाआतील मुलगे या स्पर्धेत सिंधुदुर्ग संघाने बाजी मारली. सिंधुदुर्ग या संघामध्ये व्ही. एन. नाबर मे. इं. मि. स्कूल बांदा या प्रशालेचा विदयार्थी कु. रुद्र नारायण मोरजकर याची निवड झाली होती. अहिल्यानगर येथे संपन्न झालेल्या संपूर्ण स्पर्धेत त्याला तीन सामनावीर व संपूर्ण स्पर्धेत मालिकावीर देऊन गौरविण्यात आले.

त्याच्या यशाबद्दल चेअरमन मंगेश कामत, गव्हर्निंग कौन्सीलचे सर्व सदस्य, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सुनील दिवाकर नाटेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक प्रशांत देसाई यांचे ही अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!