गणेशोत्सवासाठी आकर्षक व पर्यावरणपूरक मखरांची निर्मिती

कणकवली (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक, कलात्मक आणि पर्यावरणपूरक मखरांना मोठी मागणी वाढत असताना महेंद्र आर्ट्स – ट्रॉफी हाऊस, कणकवली यांच्या वतीने यंदा विविध आकर्षक मखरांची निर्मिती करण्यात आली आहे.

पारंपरिक कलाकुसर, आकर्षक रंगसंगती, सुंदर नक्षीकाम आणि वैशिष्ट्यपूर्ण आकार यांचा सुरेख मिलाफ असलेली ही मखरे गणरायाच्या सजावटीला विशेष शोभा आणणारी आहेत. पैठणी स्टाईल, कमळ मखर, सूर्यकिरण मखर आणि मोरपंखी मखर अशा विविध संकल्पनांमध्ये मखरे उपलब्ध करण्यात आली आहेत.

घरगुती गणपतीपासून सार्वजनिक गणेशोत्सवापर्यंत विविध ठिकाणी वापरता येतील अशा पद्धतीने मखरांची निर्मिती करण्यात आली असून, ग्राहकांच्या आवडीनुसार आकर्षक सजावट व डिझाइनची निवड करता येणार आहे.

महेंद्र आर्ट्स – ट्रॉफी हाऊस, कणकवली येथे मखरांची विक्री सुरू असून गणेशभक्तांनी आपल्या आवडीनुसार मखरांची आगाऊ नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क : 99605 03171
पत्ता :महेंद्र आर्ट्स – ट्रॉफी हाऊस
शॉप नं. १, गंगासिंधू कॉम्प्लेक्स,
मॅजिस्ट्रेट ऑफिसजवळ, मुंबई–गोवा महामार्ग,
कणकवली, जि. सिंधुदुर्ग

error: Content is protected !!