कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील हनुमंत इंगळे यांचे वडील अंबाजी सुबराव इंगळे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी इंगळे यांच्या कणकवली निवासस्थानी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले. दुःखाच्या या प्रसंगी त्यांनी कुटुंबियांच्या दुखात सहभागी होत त्यांना धीर दिला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगरसेविका मनस्वी मिथुन ठाणेकर, उद्योजक विशाल कामत आदी उपस्थित होते.
अंबाजी इंगळे कुटुंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन












