गांजा प्रकरणातील आरोपी सूर्यकांत घाडीगावकर यास जामीन

कणकवली (प्रतिनिधी) : पोलिसांनी 1.798 किलो गांजा व दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त करून दाखल केलेल्या एनडीपीएस कायद्याच्या प्रकरणातील आरोपी क्रमांक 1 सूर्यकांत राघो घाडीगावकर यास न्यायालयाने जामीन मंजूर केला.

सदर प्रकरणात आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत कलम 8(c), 20(b)(ii)(B) व 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजासह दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

आरोपी सूर्यकांत राघो घाडीगावकर याच्या जामिनासाठी अॅड. विरेश नाईक व अॅड. सिद्धेश शेट्ये यांनी न्यायालयासमोर प्रभावी युक्तिवाद केला. बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला.

या प्रकरणातील पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

error: Content is protected !!