रोटरी क्लब ऑफ खारेपाटण च्या वतीने कोर्ले – धालवली व वारगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना स्टडी अँप चे वितरण

खारेपाटण (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ खारेपाटण यांच्या वतीने देवगड तालुक्यातील कोर्ले – धालवली माध्यमिक विद्यालय कोर्ले व कणकवली तालुक्यातील शेठ म. वी केसरकर माध्यमिक विद्यालय वारगाव येथील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि काही शिक्षकांसाठी नुकतेच स्टडी अँप चे वितरण रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे माजी अध्यक्ष दयानंद कोकाटे व सचिव सुबोध देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी रोटरियन अजय गुरसाळे, खारेपाटण हायस्कूल चे पर्यवेशक रोटरीयन संतोष राऊत, कोर्ले – धालवली माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सरवणकर सर तसेच वारगाव हायस्कूल चे मुख्याध्यापक वाळके सर, शिक्षक अडविलकर सर, बाकरे मॅडम, कुबडे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

रोटरी क्लब खारेपाटण यांच्या वतीने दरवर्षी सामाजिक व शैशणिक उपक्रम राबविण्यात येत असून यावर्षी खारेपाटण पंचक्रोशीतील माध्यमिक विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या स्टडी अँप चे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार कोर्ले – धालवली माध्यमिक विद्यालयाच्या २० विद्यार्थ्यांना तर ५ शिक्षकांना स्टडी अँप चे वितरण करण्यात आले. तर वारगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना देखील यावेळी स्टडी अँप चे वितरण करण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ खारेपाटणच्या या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाबद्दल कोर्ले – धालवली माध्यमिक विद्यालय व वारगाव माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले असून विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!