कणकवली (प्रतिनिधी): जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन परिमंडळ भिरवंडे मार्फत कुंभवडे येथील महा लिंगेश्वर मंदिर व नाटळ येथील रामेश्वर मंदिर परिसरात साफसफाई करण्यात आली. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. यावेळी वनपाल स. अ. सुतार, कुंभवडे सरपंच विजया कानडे, उपसरपंच सुशांत सावंत, वनरक्षक कुंभवडे वैशाली कुंभार, वनरक्षक नाटळ पुजा चव्हाण, वन मजुर कुंभवडे दिलीप गावकर, वन मजुर नाटळ म. ल. गुडेकर, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.











