चिरेखाण व्यवसायिक शैलेश परब यांना पितृशोक
कणकवली (प्रतिनिधी) : मूळ कुडाळ तालुक्यातील कुपवडे येथील, कामानिमित्त कणकवली टेंबवाडी येथे राहणारे, वागदे येथील शासकीय दूध योजना कार्यालयाचे निवृत्त कर्मचारी शशिकांत सिताराम परब (83) यांचे बुधवार 23 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मुंबई – ठाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नात असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते चिरेखाण व्यावसायिक शैलेश परब यांचे ते वडील, कविता साटम – परब यांचे ते सासरे होत.











