वैभववाडी (प्रतिनिधी) : वेंगसर येथील विद्या मंदिर वेंगसर नं. १ केंद्र शाळेत पालक सभा उत्साहात संपन्न झाली. यावेळी शैक्षणिक उठावांतर्गत विद्यार्थ्यांना व शाळेला विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. संतोष बेलवलकर यांनी विद्यार्थ्यांना आयडेंटिटी कार्डचे वाटप केले. तसेच वेंगसरचे माजी सरपंच सुभाष कांबळे यांनी शाळेला कलर प्रिंटर भेट दिला. पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पंखे, शैक्षणिक साहित्य, समाजसुधारकांचे फोटो तसेच अन्य आवश्यक साहित्य शाळेला देणगी स्वरूपात दिले. या साहित्याची एकूण किंमत सुमारे ५५ हजार रुपये आहे.
शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी पालकांनी दिलेल्या या योगदानाबद्दल मुख्याध्यापक प्रकाश नारकर व शिक्षकवृंद यांच्या वतीने सर्व पालक, संतोष बेलवलकर आणि सुभाष कांबळे यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त करण्यात आले.











