‘सेवा सप्ताह’अंतर्गत अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; बालकांना खाऊ वाटप

महिला मोर्चा मालवण ग्रामीणचा उपक्रम; ‘अंगणवाडी सेविका म्हणजे मुलांची दुसरी आई’ — पूजा वेरळकर

आचरा (प्रतिनिधी) : ‘सेवा सप्ताह’ अंतर्गत ‘आंगण का मिलन’ उपक्रमाच्या माध्यमातून महिला मोर्चा मालवण ग्रामीणच्यावतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सेवेला सलाम करण्यात आला. यावेळी अंगणवाडीतील बालकांना खाऊचे वाटप करून सेविका व मदतनीसांचे आभार मानण्यात आले.

या कार्यक्रमाला भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी लुडबे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हा संयोजक पूजा वेरळकर, मालवण महिला तालुकाध्यक्ष ॲड. समृद्धी आसोलकर आणि समीक्षा खोब्रेकर यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पूजा वेरळकर यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कार्याचे कौतुक केले. “अंगणवाडी सेविका या केवळ बालकांची काळजी घेणाऱ्या कर्मचारी नसून मुलांसाठी दुसऱ्या आईसारख्या आहेत. बालकांच्या संगोपनासोबतच त्यांच्या शिक्षणाची व सर्वांगीण विकासाची जबाबदारी त्या प्रेमाने पार पाडतात,” असे त्यांनी सांगितले.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. बालकांना खाऊ वाटप करण्यात आल्याने त्यांच्यातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

‘सेवा सप्ताह’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल तालुकाध्यक्ष ॲड समृध्दी आसोलकर यांच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

error: Content is protected !!